Talavade News : तळवडे येथील स्व. मुकुंद नखाते चौकात वृक्षारोपण

एमपीसीन्यूज : कामगार नेते सचिन लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या प्राची किरण नखाते यांच्या पुढाकाराने तळवडे येथील स्व. मुकुंद नखाते चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच फ प्रभाग अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त नगरसेवक कुंदन गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला.

आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, भाजप युवा मोर्चाचे शहर चिटणीस किरण नखाते, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, जेष्ठ नेते शांताराम भालेकर, निलेश भालेकर, शरद भालेकर, वनदेव खामकर, अनिल भालेकर, संपत बाठे, विलास भालेकर, संग्राम भालेकर, शिवदास नखाते, सुजित नखाते आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात तळवडे येथे दहा वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. आगामी काळात टप्प्याटप्प्याने देहू -आळंदी रस्त्यालगत व अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मानस कार्यक्रमाच्या आयोजक प्राची नखाते यांनी व्यक्त केला. किरण नखाते यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.