Talavade : रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा; अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण – पांडुरंग भालेकर

Quickly fill in potholes; Otherwise plant trees in the pit - Pandurang Bhalekar :तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील सर्वच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत

एमपीसी न्यूज – तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील सर्वच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी स्थापत्य विभागाला लेखी निवेदन दिले असून बारा दिवसात हे खड्डे बुजवा; अन्यथा या खड्ड्यात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेऊ, असा इशारा स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर यांनी दिला आहे.

तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

या रस्त्यावरून वाहने चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थापत्य विभागाने 12 दिवसात खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करावे.

स्थापत्य विभाला लेखी पत्र देऊन 12 दिवसांच्या कालवधीत खड्डे जर बुजवले नाही तर आमदार महेश लांडगे युवा मंच यांच्या वतीने सर्व नागरिकांना सोबत घेऊन 13 व्या दिवशी या खड्ड्यात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेऊ, असा इशारा स्वीकृत सदस्य भालेकर यांनी कार्यकारी अभियंता फ प्रभागाच्या स्थापत्य विभागाला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.