Talavade : दीड लाखांचे प्लंबिंगचे साहित्य चोरले

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश करून बंगल्यातून सुमारे 1 लाख 55 हजार 982 रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री पावणेबाराच्या सुमारास चिखली तळवडे रोडवर घडली.

हर्षद सतीश भंडारी (वय 25, रा. रूपीनगर) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद यांनी कामासाठी 1 लाख 55 हजार 982 रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य आणले होते. ते त्यांनी त्यांच्या घरामध्ये ठेवले होते. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करून हे सर्व साहित्य चोरून नेले.  हर्षद यांनी देहूरोड पोलिसात गुन्हा नोंदवला असून देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.