Talawade Crime News : गेटचा पत्रा उचकटून कंपनीतील मशिन, बिअरिंग व जॉब चोरले

एमपीसी न्यूज – गेटचा पत्रा उचकटून कंपनीतील महागडी मशिन, बिअरिंग व जॉब अज्ञात चोरट्याने चोरून नेले. जोतिबानगर, तळवडे येथील कन्व्हेअर सिस्टिम कंपनीत 09 ते 11 जून दरम्यान रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडला.

याप्रकरणी दीपक रंजन चौधरी (वय 36, रा. खडकी, शिवाजीनगर) यांनी शुक्रवारी (दि.11) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने कन्व्हेअर सिस्टिम कंपनीच्या गेटचा पत्रा उचकटून महागडी मशिन, बिअरिंग व जॉब चोरून नेले आहे. दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षिक रामेकर अधिक तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.