Talawade : तळवडेतील दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील (Talawade) फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Talawade : तळवडे येथील आगीत दहा जखमी, सहा जणांचा मृत्यू; जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु

तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला आज दुपारी आग लागली. कारखान्यात 16 कामगार काम करत होते. आगीत सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, (Talawade) अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मधील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.