Talwade : ‘चांगभल’च्या गजराने ज्योतिबाची यात्रा उत्साहात

एमपीसी न्यूज – चांगभलंचा गजर, गुलाल – खोब-याची उधळण करीत तळवडे येथे ज्योतिबाची चैत्र यात्रा उत्साहात झाली. उन्हाच्या तडाख्यातही भाविकांचा उत्साह दिसून आला. 

यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घेतला. रविवारी सकाळी कलश, वीणा व टाळपूजन करण्यात आले. पहाटेपासूनच श्रींची महापूजा व काकड आरती, दुपारी तीन वाजता भजन सेवा, सायंकाळी सहा वाजता हरिपाठ तसेच रात्री सात ते नऊ या वेळेत भजनाचा आनंद भाविकांनी घेतला.
  • विनोदाचर्य हभप भरत महाराज जोगी, हभप मंगेश महाराज दाताळकर, नवनाथ महाराज मस्के, योगीराज महाराज गोसावी यांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता आला. तसेच कीर्तनरत्न हभप अनिल महाराज पाटील यांचे काल्र्याचे कीर्तन झाले. यामध्ये हभप अशोक महाराज  इदगे यांनी मृदुंगमणीवर साथ केली. तर हभप महादेव महाराज आव्हाड, हभप पांडुरंग महाराज भोसले, हभप प्रसाद महाराज नखाते यांनी काकडा, हरिपाठ केले. तसेच नवनाथ भालेकर, आनंद पनमांद, शाम अंबुलकर यांनी पुजारी म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन तळवडे येथील ज्योतिबा तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळींनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.