Talawade : मिक्सरची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  मिक्सर टॅंकरने एका दुचाकीला (Talawade) जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजता महाळुंगे ते तळवडे रोडवर महिंद्रा कंपनीच्या गेट क्रमांक दोन समोर घडली.

ज्ञानेश्वर गणेश मते असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी शुभम नारायण गावंडे (वय 27, रा. तळवडे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद राजेश बेलसरे (वय 25, रा. वासुली फाटा, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ज्ञानेश्वर हा फिर्यादी शुभम यांचा मित्र होता. ज्ञानेश्वर हे त्यांच्या दुचाकीवरून महाळुंगे येथून तळवडे च्या दिशेने येत होते. त्यावेळी आरोपी गोविंद याने त्याच्या ताब्यातील मिक्सर टॅंकर भरधाव चालवून ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात ज्ञानेश्वर (Talawade) हे रस्त्यावर पडले. ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.