Talawade News : सार्वजनिक नळावरील वाद, जातिवाचक बोलल्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला, या वादात जातिवाचक बोलल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई कृपा हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे येथे रविवारी (दि.20) सायंकाळी 5.30 वा. ही घटना घडली.

विजय नागनाथ दाखले (वय 32, रा. साई कृपा हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे) यांनी सोमवारी (दि.21) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुरेश परिहार, प्रकाश सुरेश परिहार आणि एक महिला (सर्व रा. सहयोगनगर, तळवडे) या तीन जणांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी साईकृपा हौसिंग सोसायटी, तळवडे येथे भाडोत्री म्हणून रहायला असून, एकमेकांचे शेजारी आहेत. फिर्यादी यांची मुलगी पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर गेली, त्यावेळी आरोपी महिलेने तिला पाणी भरू दिले नाही. त्यामुळे फिर्यादी यांची पत्नी त्याठिकाणी गेली असता, त्यांना मारहाण केली व गालावर चापट मारली. फिर्यादी येथे गेल्यावर त्यांना जातीवाचक बोलून येथे पाणी भरायला येऊ नका असे बोलले. तसेच, फिर्यादी यांना मारहाण करून दुखापत केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.