Talawade : गरजूंना वाटला स्वतःच्या शेतामधील गहू ; नगरसेवक प्रवीण भालेकर यांचे अनोखं दातृत्व

एमपीसी न्यूज – पुराणामध्ये बळीराजाच्या दातृत्वाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र, संचारबंदीच्या काळात लोकांना मदतीची जास्त गरज असताना नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या अनोख्या दातृत्वाचे दर्शन लोकांना घडले. तळवडे येथील प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक असणारे भालेकर यांनी एक एकर शेतीमधील गहू गरजू लोकांना वितरित केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

भालेकर यांनी परिसरातील उद्योजक व मित्रांना शक्य त्या पद्धतीने मदत करण्याचे आवाहन. त्यानुसार जमा झालेल्या गहू, तांदूळ, डाळ, तेल, मसाले, सॅनीटायझर आदी साहित्य एकत्रित करून त्याचे किट तयार करण्यात आले. त्यानंतर परराज्यातून कामधंद्यासाठी आलेल्या मजुरांना तसेच मोलमजुरी करून उपजीविका करणारे गरजू लोकांना या किटचे वाटप केले.

संचारबंदीचा कालावधी तीन मेपर्यंत वाढवल्यामुळे अगोदरच भुकेने बेहाल होणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तळवडे, रूपीनगर, त्रिवेणीनगर या भागातील मोलमजुरी करणारे, तसेच उदरनिर्वाहासाठी परराज्यातून आलेल्या कामगारांना भालेकर यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. रेशन कार्ड नसल्यामुळे शासनाच्या इतर सुविधांचा व रेशनिंगचे धान्य गरीब लोकांना मिळत नसल्यामुळे दरेकर यांच्या मदतीमुळे या लोकांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.