Talegan Dabhade : व्यायामशाळेमुळे संस्कृती व प्रकृती दोन्ही गोष्टी साध्य- माउली दाभाडे

माळवाडी ग्रामपंचायतीच्या अत्याधुनिक जिमचे माऊली दाभाडे यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज- संस्कृती व प्रकृती या मुख्य दोन गोष्टीमधून समाज घडत असतो. व्यायामशाळेमुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात. सामुदायिक संस्कृतीत वाढ होत जाते. त्यामुळे तरूणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होते. व्यायामामुळे प्रकृती ठणठणीत राहते असे मत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी व्यक्त केले. माळवाडी ग्रामपंचायतीच्या अत्याधुनिक जिमचे उदघाटन माऊली दाभाडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, सरपंच सुनील दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी दाभाडे बोलत होते.

यावेळी माजी सरपंच गणेश दाभाडे, माजी सरपंच बाळू भोंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बजरंग जाधव, गोरख दाभाडे, शिवाजी दाभाडे, दीपक दाभाडे, संपत दाभाडे, सिद्धार्थ दाभाडे, शेखर दाभाडे, गणेश काकडे, संदीप दाभाडे, अनिल दाभाडे, सचिन दाभाडे, कैलास दाभाडे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

माळवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत असून अत्याधुनिक व्यायामशाळेचे व्यायाम साहित्य जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या प्रयत्नाने पुणे जिल्हा परिषदेमधून देण्यात आले आहे. यावेळी सरपंच सुनील दाभाडे नितीन मराठे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक सरपंच सुनील दाभाडे यांनी केले, सूत्रसंचालन बजरंग जाधव यांनी केले तर आभार अनिल दाभाडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.