BNR-HDR-TOP-Mobile

Talegao Dabhade : कमळाबाई कराळे पाटील यांचे निधन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – सुदवडी (ता.मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक कमळाबाई तुकाराम कराळे पाटील (वय 102) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.कमळाबाई कराळे या धार्मिक वृत्तीच्या होत्या.

त्यांच्या मागे चार मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.सुदवडीचे पोलीस पाटील वसंतराव कराळे,सामाजिक कार्यकर्ते किसनराव कराळे पाटील, माजी ग्रापंचायत सदस्य दत्तोबा कराळे पाटील आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कराळे पाटील यांच्या त्या मातोश्री होत. भंडारा डोंगर देवस्थानचे मुख्य विश्वस्त ह.भ.प. रामभाऊ ज्ञानेश्वर कराळे पाटील यांच्या त्या चुलती तर माजी सरपंच सुमन कराळे पाटील यांच्या त्या सासूबाई होत.

HB_POST_END_FTR-A4

.