Talegaon News : तळेगाव दाभाडेमधील विविध विकासकामांसाठी 27 कोटींचा निधी मंजूर – आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 27 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शासनाचा अर्थसंकल्प, वैशिष्ट्यपूर्ण योजना, ठोक तरतूद, नगरोत्थान निधी (डीपीडीसी), क्रीडा विभाग अशा विविध निधींमधून तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांना मंजुरी मिळवून निधी आणण्यात यश मिळाल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

मंजूर झालेल्या 31  कामांची यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत भाजपची सत्ता असून त्यांनी आपल्याकडे आणखी कामे प्रस्तावित केली तर त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली.

तळेगाव ते चाकण रस्ता इंदोरी हद्दीपर्यंत रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी 2020-21 च्या अर्थसंकल्पात सहा कोटींची तरतूद आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानाची डागडुजी व दुरुस्तीच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंदाजपत्रकात 1 कोटी 12 लाख रुपये, तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.

जिजामाता चौक ते घोरावडी रेल्वे स्टेशन रस्ता करणे तसेच सोमाटणे फाटा ते तळेगाव रस्त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती शेळके यांनी दिली.

प्रभाग क्रमांक एक मध्ये यशवंतनगर येथील प्लॉट क्र.59 भक्ती पार्क ते स्वरगंध बिल्डिंगपर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 18 लाख 63हजार रुपये, यशवंतनगर येथील प्लॉट क्र. 303 दत्तकृपा ते भगत प्रॉपर्टी ते भक्ती पॅराडाईज ते श्रमसाफल्य अपार्टमेंट, शांतीनाथ अपार्टमेंट ते बालाजी हाईट्सपर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 21 लाख 2 हजार रुपये, तपोधाम कॉलनी ते गोल्ड जिम ते प्लॉट क्र. 71 पर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 74 लाख 99  हजार रुपये, तपोधाम कॉलनी शंकर मंदिर आगळे यांच्या बंगल्यापर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 55 लाख 69 हजार रुपये, प्लॉट नं. 351 ते 343, 352 ते 359 तसेच 366 ते 370पर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 43 लाख 50 हजार रुपये, शिवाजी चौक ते मुंबई निवास ते सुमंगल अपार्टमेंटपर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 33 लाख 4 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रतीकनगर येथील सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी शंकर मंदिरापर्यंत आरसीसी पाईप टाकण्याच्या कामासाठी 23 लाख 21  हजार रु. निधी उपलब्ध झाला आहे, असे शेळके यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक चार मधील वतन नगर येथील गणेश मंदिरासमोर रस्ता मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करणे 22 लाख 57 हजार, तुळजाभवानी मंदिरा समोरील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 21 लाख 12हजार, संत ज्ञानेश्वर शाळाच्या बाजूकडील व मागील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 13 लाख 89 हजार, प्रभाग क्रमांक पाच मधील उमंग सोसायटी टेलिफोन एक्सचेंज रस्ता सुधारणा करणे 4 कोटी, राजगुरव कॉलनी येथील अंतर्गत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 41 लाख 80 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक सहा मधील हरणेश्वर कॉलनीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 41 लाख 25 हजार, प्रभाग क्रमांक सात मधील चाकण वडगाव रस्ता ते ओझोन अपार्टमेंट रस्ता व अंतर्गत रस्ते मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 56 लाख 71 हजार रु., महावितरण कार्यालय ते तळेगाव चाकण महामार्गापर्यंत रस्ता करणे 40लाख रुपये,

प्रभाग क्रमांक आठ मधील जव्हेरी कॉलनी अंतर्गत रस्ते करणे 60लाख रु., मस्करनेस कॉलनी भाग 2 येथील अंतर्गत रस्ते मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 74  लाख 92  हजार, कडोलकर कॉलनी येथील अंतर्गत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात 74 लाख 95  हजार, मस्करनेस कॉलनी दोन येथून डीपी रस्त्यापर्यंत बंदिस्त आरसीसी पाईप लाईन16लाख 84 हजार निधी मंजुर करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक नऊ मधील खडक मोहल्ला ते भोई आळी रस्ता सुधारणा करणे 20 लाख 63 हजार, जिजामाता चौक ते नीलकंठ नगर रस्ता सुधारणा करणे 48लाख 93हजार, तेली आळी ते खडक मोहल्ला रस्ता सुधारणा करणे 42लाख 62 हजार,

प्रभाग क्रमांक दहा मध्ये सभागृह बांधण्यासाठी 46  लाख 64 हजार, शिवाजी टॉकीज लगत ते सुभाष मार्केट पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 41लाख 19 हजार, दाभाडे आळी ते राम मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 9 लाख 84 हजार, सुभाष चौक ते डोळसनाथ मंदिर ते गणपती चौक रस्ता डांबरीकरण करणे, 73 लाख 97 हजार निधी मंजुर करण्यात आले असून तळेगाव दाभाडे येथे क्रीडा संकुल बांधण्याच्या कामासाठी आठ कोटी रुपये प्रस्तावित असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.