BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon – भरधाव दुचाकी कठड्याला थडकली; अपघातात दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्युज – रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला दुचाकी धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 17) सकाळी सातच्या सुमारास बेगडेवाडी-माळवाडी रस्त्यावरील घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ झाला.

श्रीनिवास विश्वंभर पवार (वय 28), शीतलकुमार महावीर चिंचवडे (वय 33, दोघे रा. म्हाळुंगे, ता. खेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. संदीप श्रीनिवास शेट्टी (रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीनिवास, शितलकुमार आणि संदीप हे तिघेजण दुचाकीवरून (एमएच 14/ एवाय 0209) जात होते. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची बेगडेवाडी-माळवाडी रस्त्यावर घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या कठड्याला थडकली. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, श्रीनिवास आणि शितलकुमार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याचा पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.