Talegaon: हाऊस किपिंग कॉन्ट्रॅक्ट मागण्यासाठी अपरात्री सोसायटीत घुसणाऱ्यांकडून सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला

Talegaon: Attack with sharp weapon on a security guard by intruders entering a society to demand a housekeeping contract

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या मालकाला भेटायचे आहे. तसेच सोसायटीमधील हाऊस किपिंगचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आहे, असे म्हणत रात्री उशिरा सोसायटीत प्रवेश करणाऱ्या दोघांना सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षकांनी अडवले. त्यावरून दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 11) रात्री आठच्या सुमारास लोढा बेलमोंडो सोसायटीच्या गेटवर गहुंजे येथे घडली.

नवनाथ गोपीनाथ किंद्रे (वय 34, रा. साईनगर, गहुंजे, ता. मावळ) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरबाज बशीर शेख (वय 22, रा. गहुंजे, ता. मावळ), नितीन राम आवताडे (वय 32, रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवनाथ हे गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री नवनाथ आणि त्यांचे चार सहकारी सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटीवर होते. रात्री आठच्या सुमारास दोन्ही आरोपी रिक्षातून तिथे आले.

_MPC_DIR_MPU_II

आरोपी अरबाज हा फिर्यादी नवनाथ यांच्याजवळ आला आणि म्हणाला की, ‘मला तुमच्या लोढा सोसायटीच्या हाऊस किपिंगचे कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. मला लोढाच्या मालकाला भेटायचे आहे.’ त्यावेळी नवनाथ यांनी अरबाजला सांगितले की, ‘तू इथून निघून जा, तुला लोढा साहेबांना भेटता येणार नाही.’ यावरून आरोपीने नवनाथ यांना शिवीगाळ केली. रिक्षातून कोयता आणून नवनाथ यांच्या डोक्यात वार केला. नवनाथ यांनी वार चुकवला. त्यांनतर आरोपीने सोसायटीच्या आत प्रवेश केला.

नवनाथ यांच्या चार सहकारी सुरक्षा रक्षकांनी आरोपी अरबाज याला पकडून ठेवले. त्यानंतर आरोपी नितीन याने नवनाथ यांना हाताने मारहाण केली. नवनाथ यांनी नितीनला पकडून ठेवले. आरोपींनी सर्व सुरक्षा रक्षकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर सिक्युरिटी मॅनेजर माऊली सिंग यांना बोलावले.

सोसायटीचे पदाधिकारी, सिक्युरिटी मॅनेजर सर्वजण मेन गेटवर आले असता आरोपी अरबाज याने ‘हा माझा एरिया आहे. मला लोढा बिल्डरकडून एक लाख रुपयांची खंडणी पाहिजे’ असे म्हटले. सोसायटी पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षकांनी दोन्ही आरोपींना पोलीस चौकीत हजर केले आणि गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like