Talegaon : लायन्स क्लब तळेगाव एक वजनदार क्लब

समाजातील सर्व स्तरांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार

एमपीसी न्यूज -एक जुलै 2018 पासून सन 2018-2019च्या लायन्स क्लब तळेगावच्या पहिल्या महिला अध्यक्षा लायन राजश्री शहा यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्याची सुरुवात करुन गेल्या सहा महिन्यात 272 करुन 114711 लोकांपर्यंत विविध कार्य केले आहे.

वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून दर रविवारी आठवडा बाजारात खेड्यातून येणा-या शेतकरी बांधवासाठी, गरीब आणि गरजूसाठी फक्त 10 रुपयांत भोजनाची व्यवस्था मारुती मंदिर, मारुती चौक येथे दर रविवारी सकाळी 12 ते 2 या वेळात करण्यात येते. पुढील काळातही हे कार्य चालू राहील असे अध्यक्ष राजश्री शहा यांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे महिलांसाठी डायबिटीस आणि कर्करोगाची तपासणी विविधा शाळेत, सोसायटी अनेक ठिकाणी करण्यात आली. तळेगाव स्टेशन विभागात 22 ठिकाणी शिबिरामध्ये जवळजवळ 2640 महिलांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी तळेगाव स्टेशन विभागात झाली. हे दोन्ही कार्यक्रम दर आठवड्याला घेण्यात येतात.

  • कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
    तसेच विविध कार्यक्रम ही या लायन्स क्लब ऑफ तळेगावच्यावतीने घेण्यात येतात. त्यात शिवनेरी जुन्नर येथील वृध्दाश्रमास वॉशिंग मशीनची भेट, केरळ पूरग्रस्तांसाठी भरघोस मदत, अंध, अपंग, मतिमंद, विद्यार्थी या सर्वांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे विवेकानंद मल्टीपर्पज हॉलचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून अनेक लोकांना त्याचा लाभ घेता येईल. या सर्व कार्यक्रमाचा लाभ तळेगावकरांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा राजक्षी प्रशांत शहा यांनी केले.
  • अध्यक्षा राजश्री प्रशांत शहा यांचा विशेष सत्कार
    गेल्या 48 वर्षात प्रथम महिला अध्यक्षांचे काम पाहून लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि डिस्ट्रिक 32, 34 D2 सर्व प्रांताच्या अधिका-यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रांतपाल लायन रमेश शहा यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल लायन राजश्री प्रशांत शहा अध्यक्षा म्हणून विशेष सत्कार केला. लायन्स क्लब ऑफ तळेगाव हा संपूर्ण प्रांतात अव्वल स्थानांवर असून अभिनंदन केले, लायन राजश्री शहा यांनी म्हटले आहे की, सर्व शक्य झाले तर लायन्स क्लबमधील मित्रपरिवारामुळे, येणा-या काळात समाजातील सर्व स्तरांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन तळागाळातील लोकांपर्यत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.