Talegaon : वराळे येथील भैरवनाथ विद्यालयाचा 100 टक्के निकाल

100% result of Bhairavnath Vidyalaya at Warale : पहिले तीन क्रमांक विद्यार्थिनींनी पटकावले

एमपीसीन्यूज : मार्च 2020 मध्ये झालेल्या एस.एस.सी. परिक्षेत वराळे येथील श्री.भैरवनाथ विद्यालयाचे 36 विद्यार्थी (18 मुले+ 18मुली) प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

या विद्यालयातील पहिले तीन क्रमांक विद्यार्थिनींनी पटकावले आहे. आकांक्षा मराठे(९०टक्के), सूरज मराठे (८९.४०टक्के), नम्रता बनसोडे (८९ टक्के) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी डाॅ.कृष्णकांत वाढोकर, यादवेंद्र खळदे, संजय भालेराव, प्रा. वसंत पवार तसेच जि. प. सदस्य नितीन मराठे, सरपंच मनिषा शिंदे ,मुख्याध्यापिका ललिता कांबळे यांनी विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.