Talegaon: सावरकर जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात 101 नागरिकांनी केले रक्तदान

101 citizens donated blood in the camp organized on the occasion of Savarkar Jayanti

एमपीसीन्यूज : भारतीय जनता पार्टी व स्वा. सावरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानानने स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १०१ नागरिकांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, स्वा. सावरकर यांचे नातलग अमेय गुप्ते यांच्या हस्ते झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुसूदन शिरोडकर यांची उपस्थिती होती.

प्रमुख व्याख्याते प्रशांत दिवेकर यांनी “संघटक स्वा. सावरकर व सद्य परिस्थिती” या विषयावर विचार व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतुलनीय योगदान याविषयी विवेचन केले. कार्यकर्त्यांना कोरोना विषयी काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन केले.

या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास मोरया ब्लड बँक व भाजप शहर व सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे, नगरसेवक सुशिल सैंदाणे, अरूण भेगडे, गटनेते अमोल शेटे, विभावरी दाभाडे, कल्पना भोपळे, शोभा भेगडे, प्राची हेंन्द्रे, काजल गटे, श्रीराम कुबेर या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमासाठी सोशल डिस्टंसिंग, स्क्रिनींग,सॅनीटाईजेशन याचा वापर करून योग्य काळजी घेण्यात आली.

याप्रसंगी प्रशांत दिवेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध पैलू आपल्या लालित्यपूर्ण व्याख्यानातून  मांडले.  सावरकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या नियोजित उपक्रमासाठी इंद्रायणी नायडू आणि रमाकांत नायडू या दांपत्याच्या वतीने 21000/- रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपुर्त करण्यात आला.

स्वागत स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश यशवंतराव दाभाडे यांनी केले. रविंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सतीश राऊत यांनी तर आभार शोभा परदेशी यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजप शहर कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, संघटनमंत्री सचिन टकले, सरचिटणीस विनायक भेगडे, रवींद्र साबळे, रविंद्र भोसले, प्रदीप गटे, रजनी ठाकुर, संजय दाभाडे, प्रसिध्दीप्रमुख महेश सोनपावले,आशुतोष हेंन्द्रे, सचिन जाधव, राजू भेगडे, दिनेश कुलकर्णी, अनिल वेदपाठक, मयुर भोकरे, भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाकुंर खेर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शुभम कुल, अलंकार भोसले, युवती अध्यक्षा अपूर्वा मांडे, महिला आघाडी अध्यक्षा मोहिनी भेगडे, अंजली जोगळेकर, महिला आघाडी कार्याध्यक्षा तनुजा दाभाडे, अश्विनी काकडे, संजय जाधव, संतोष कि.भेगडे, निलेश मेहता, महावीर कणमुसे, सुधीर खांबेटे, सुनिल कांबळे, सागर शर्मा, अरुणकुमार शुक्ला, मल्लेशी कुमार पानी, गौरव शहा, रविंद्र पोखरकर, रणजीत पिंगळे, योगेश जांभूळकर, धनश्री बागले, निशांत म्हाळसकर, सचिन आरते, सतिष शिंदे, योगेश जांभुळकर, व स्वा.सावरकर प्रतिष्ठानचे हिम्मत पुरोहित, प्रशांत दाभाडे, प्रकाश लोणकर, अविनाश कुरणे, अनिल नाटे, दर्शन गुंड, उदय गाडे, शरद केसकर,अनिल नाटे यांनी परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.