Talegaon : वडिलांनी गेम खेळायला मोबाईल न दिल्याने 12 वर्षीय मुलाची आत्महत्या

12-year-old boy commits suicide after father refuses to give him mobile : मुलाच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे.

एमपीसी न्यूज – वडिलांनी गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन दिला नाही. या कारणावरून 12 वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 31) दुपारी साडेबाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे उघडकीस आली.

प्रथमेश देवानंद डाकोरे (वय 12, रा. वारंगवाडी, ता. मावळ. मूळ रा. मेहकर, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तळेगाव येथील शाळेत सहावीत शिकत होता. तो अतिशय हट्टी होता. त्याला वडिलांनी गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही.

_MPC_DIR_MPU_II

या कारणावरून तो चिडला होता. त्यातूनच त्याने शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्कार्फच्या साहाय्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

प्रथमेशचे आई-वडील मजुरीचे काम करतात. ते मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असून रोजगाराच्या शोधत तळेगावात आले आहेत. मागील चार-पाच महिन्यांपूर्वी डाकोरे कुटुंब तळेगाव जवळील वारंगवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते.

मुलाच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर प्रथमेशचा मृतदेह त्याच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.