Talegaon News : कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमास 200 किलो तांदूळ भेट

200 kg rice gift to old age home on the occasion of Krishnarao Bhegade's birthday

एमपीसीन्यूज : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्याकडून जुन्नर येथील राजाराम पाटील वृध्दाश्रमास 200 किलो तांदूळ देण्यात आले.

ॲड. पु. वा. परांजपे‌ विद्यालयाच्या प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आयोजित कार्यक्रमात तांदळाची पोती राजाराम पाटील वृध्दाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

अध्यक्षस्थानी ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार होते.

नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेविका संगीता शेळके, तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुनिता काळोखे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, वृध्दाश्रमाचे संचालक संदीप पानसरे, युवती अध्यक्षा निशा पवार, युवती उपाध्यक्षा शिवानी सोनवणे, ओबीसी सेलच्या अध्यक्षा विद्या भोसले, तालुका उपाध्यक्षा शैलजा काळोखे, तालुका सरचिटणीस वीणा करंडे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात शेलार यांनी कृष्णराव भेगडे यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच सेवाभावी कार्यास सर्वोतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.

उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी भेगडे यांच्या 85 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत परांजपे शाळेच्या आवारात 85 औषधी व फळझाडे देऊन एक‌ आगळेवेगळे उद्यान उभारण्याचा मनोदय व्यक्त केला.

कृष्णराव भेगडे यांनी सामाजिक बांधिलकीतूनच सेवाभावी कार्याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे; तोच आदर्श ठेवून हे सेवाभावी कार्य केल्याचे दाभाडे यांनी सांगितले.

नूमवि संस्थेचे व राजाराम पाटील वृध्दाश्रमाचे संचालक सोनबा गोपाळे (गुरूजी) यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक भगवान शिंदे यांनी केले. नंदकुमार शेलार यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय नांगरे, नरेंद्र इंदापुरे, संपत गोडे, नयना पारिठे, अरूणा भिलारे, पांडुरंग शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन वैशाली कोयते यांनी केले. आभार वर्षाराणी गुंड यांनी मानले.

कृष्णराव भेगडे यांनी मावळ तालुक्यातील 50 वर्षीच्या आपल्या सुवर्णमयी कारकिर्दीत शेती, सहकार, शिक्षण, राजकीय, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले असून ते कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तोच वसा आणि वारसा आपण जपावा. नंदकुमार शेलार – सहसचिव नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.