Talegaon : तळेगाव दाभाडे येथे 50 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरातून सुमारे 49 हजार 500 किमतीचे दागिने, घड्याळ, कॅमेरा आणि बॅग चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 8) रात्री पावणेनऊ वाजता यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.

ज्ञानदेव गणपत होलमुखे (वय 70, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होलमुखे यांचे घर 4 फेब्रुवारी दुपारी बारा ते 8 फेब्रुवारी रात्री पावणेनऊ या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील कापून घरात प्रवेश केला. घरातून अर्धा किलो चांदीचे दागिने, तीन घड्याळे, कॅमेरा, स्काय बॅग असा एकूण 49 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.