Talegaon: PCET च्या नूतन अभियांत्रिकीमधील हर्षल पवारला 7 लाखांचे पॅकेज  

Talegaon: 7 lakh package for Harshal Pawar in PCET's Nutan engineering College पीसीईटीच्या नूतन अभियांत्रिकीचे प्लेसमेंटचे शतक पार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आय टी विभागात शिकणाऱ्या हर्षल पवारची निवड मॉर्गन स्टॅन्ली या नामांकित कंपनीत झाली व त्याला वार्षिक सात लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे अशी माहिती पीसीईटी व नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार  रवंदळे  यांनी दिली. 

पीसीईटी व नूतन ग्रुपचे सेंट्रल प्लेसमेंट सेल दर वर्षी विद्यार्थ्यांना सुमारे 300 नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी देते. बहुतेक कंपन्यांची पात्रता सर्व वर्षात प्रथम श्रेणी हि असते व त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळवणे आवश्यक असते. नूतनच्या पात्र विद्यार्थ्यांपैकी 90 % विद्यार्थ्याचे प्लेसमेंट झाले आहे. विविध नामांकित कंपन्यात  विध्यार्थ्यांना 110 नोकऱ्या मिळाल्या आहेत.

कोरोनामूळे भारतात बऱ्याच जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या असल्या तरी पीसीईटी नूतनमध्ये मात्र  विद्यार्थ्याना चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार  कृष्णराव भेगडे यांनी दिली. विद्यार्थ्यांची निवड नामांकित अश्या कॅपजेमिनी, पर्सिस्टन्ट, टीसीएस, बिर्लासॉफ्ट, अमॅझॉन, हेक्सावेर या सारख्या इतर कंपन्यात झाली आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार संजय (बाळा ) भेगडे यांनी दिली.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव  नंदकुमार शेलार, कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कॉलेजचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, टीपीओ प्रा. ऋषिकेश  पांडे यांनी केले आहे. सर्व स्तरातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.