Talegaon : किरकोळ कारणावरून गाडी चालकाला शिवीगाळ करत गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून (Talegaon) एका टेम्पो चालकाने दुसऱ्या गाडी चालकाला शिवीगाळ करत दगडाने गाडीचे नुकसान केले आहे. ही घटना रविवारी (दि.11) तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.

याप्रकरणी अविनाश अनंत मोरडेकर (वय 32 रा. नवी मुंबई) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विशाल नंदकुमार खंडागळे (वय 24 रा.वराळे) अविनाश काळु अडागळे (वय 22 रा. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे, पिंपरी चिंचवड मधील कॅब चालकांचे 20 फेब्रुवारी पासून आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गाडी समोर आरोपीचा छोटा हत्ती टेम्पो थांबला होता. त्याला ओव्हर टेक करून गेले. आरोपीने त्याचा टेम्पो फिर्यादीच्या गाडी समोर आडावा आणून लावला व शिवीगाळ करत रोडवरील (Talegaon) दगड मारून फिर्यादीच्या गाडीवर मारून त्यांच्या गाडीचे नुकसान केले. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.