Talegaon : शिक्षण नसे एक प्रयोगशाळा !

A laboratory for learning veins!

एमपीसीन्यूज : नुकतेच lockdown नंतर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतची बातमी वाचायला मिळाली. मात्र, यात एक पालक म्हणून स्पष्टता दिसत नव्हती. शाळा सुरु कधी होणार ? (खऱ्या अर्थाने ) याचे ठोस उत्तर वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे आहे. बर ! हा विषय इथेच संपत नाही, तर शाळा सुरु झाल्यावर अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणार कि नाही ? हा ही प्रश्नच आहे.

शिक्षक लोक खाजगीत हा प्रश्न उपस्थित करतात. तेव्हा त्यांना काही लोक ते तुमच्यावर आहे अस म्हणून आपली हतबलता स्पष्ट करतात.

मध्यमवर्गीय कुटुंबांमध्येही अजून अशी काही लोक आहेत कि ज्यांच्याकडे अत्यंत साधे मोबाईल आहेत. ज्यावर intarnet ही खूप कमी उपलब्ध आहे.

online शिक्षणाच समर्थन करणाऱ्यां प्रथम आपल्याकडे व्हर्चुअल साक्षरता आहे कि नाही हे कधी तपासूनच पाहिले नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक सुजाण म्हणवणाऱ्या पालकांना व्हिडीओ कसा पाहावाकिंवा एखादी व्हर्चुअल क्लास रूममध्ये कसे दाखल व्हायचे. हे ही माहिती नाही. प्रथम ही साक्षरता महत्वाची आहे.

सद्य परिस्थितीचा विचार करून काही लोक सहज बेदरकारपणे असा ही निष्कर्ष काढतात की “हे वर्ष विसरा”. हे बोलण, लिहिण खूप सोप आहे. पण अस एक शैक्षणिक वर्ष विसरता येत नाही. आपण २०२० या वर्षात आहोत.

21  शतक हे स्पर्धात्मक युग आहे आणि इथे जास्तीजास्त ज्ञानच तुम्हाला तारू शकत. रोजगारांच्या संधी, त्यातली आव्हान हे वाढतच जाणार आहे .अशा वेळी एक वर्ष आणि त्याची किंमत ही इतकी सोपी नाही.

आजवर शिक्षण क्षेत्राकडे फक्त एक प्रयोगशाळा म्हणून पाहणाऱ्यांचे प्रमाण या system मध्ये वाढतंय. काही लोक अस ही म्हणतात कि शालेय शिक्षण कुठे उपयोगात येत, हे साफ चुकीच आहे.

शालेय शिक्षणाने आपला पाया पक्का होतो. जस आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी जस खेळाडूला क्लबच्या सामन्यांपासून एकेक टप्पा पार करत पुढे जाव लागत हे अगदी तसच आहे.

उच्चशिक्षित होण्यासाठी जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आपल्याला शालेय शिक्षण महत्वाच आहेच. त्याच नियोजन करणारे जे कोणी संबंधित आहेत.

त्यांनी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे. आलं मनात म्हणून करून पाहिलं हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारख आहे.

त्यामुळे नीट नियोजन करून आरोग्य आणि शिक्षण याचा नीट विचार करून शाळा या संकल्पनेचा आदर राखत सर्व-समावेशक रीतीने त्या सुरळीत सुरु कराव्यात.

त्याच्या नियोजनात कल्पकता दाखवा, प्रयोग नका करू. शाळा सुरु केल्यावर मधल्या सुट्टीत त्यांच्यात अंतर कस राखणार. तर इथे कल्पकता येईल.

सरसकट मधली सुट्टी न करता एका वेळी २ अथवा ३ विद्यार्थी वर्गातून बाहेर पडण्याची परवानगी देता येईल.

महाविद्यालयीन मुलांसाठी सुद्धा नीट विचार करूनच परीक्षांच नियोजन व्हावं. त्यावर त्यांच करियर अवलंबून आहे हे भान असायलाच हव.

परीक्षा न घेऊन केवळ पुढे ढकलण ,हा तोडगा असूच शकत नाही. त्यावर एकमत, एकवाक्यता ठेऊन काम करण्याची गरज आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा नको इतकच वाटत.

हर्षल विनोद आल्पे – तळेगाव दाभाडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.