Talegaon : 6 लाख रुपये किंमतीची गाडी परत करण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकारणी एकास अटक

एमपीसी न्यूज : 6 लाख रुपये किंमतीची गाडी परत करण्यास (Talegaon) टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकारणी एकास अटक केली. अक्षय कांबळे (वय 25 वर्षे, रा. वराळे) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवींद्र उमप (वय 27 वर्षे, वराळे, तालुका मावळ) यास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीचा मित्र म्हणजेच आरोपीने त्याच्या वापरासाठी फिर्यादी यांची 6 लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही 500 एफ डब्लू 8 हे चारचाकी गाडी आठ दिवसासाठी भाडेतत्वावर 20 फेब्रुवारी 2022 ला रात्री 9 वा नेली. फिर्यादी यांनी आरोपीकडे वेळोवेळी गाडीच्या भाड्याचे पैसे मागितले असता त्याने फिर्यादीस उद्या परवा देतो, गाडी बाहेर गेली आहे, गाडीचे काम चालू आहे अशी वेगवेगळी उडवा उडवीची कारणे सांगून फिर्यादीची गाडी देण्यास टाळाटाळ करून गाडी परत केली नाही. त्याने फिर्यादीची (Talegaon) फसवणूक केली. आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 420, 406 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Pimpri news: चिंचवडमधील एका अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने पळवले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.