Talegaon: बेकायदेशीररित्या मांसविक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यावर कारवाई; दोघांना अटक

Talegaon: Action against those who smuggle meat illegally; Both arrested पोलिसांनी कारमधून 13 हजार रुपये किमतीचे 130 किलो मांस आणि एक लाख 50 हजार रुपये किमतीची कार जप्त करत दोघांना अटक केली आहे.

एमपीसी न्यूज– बेकायदेशीररीत्या मांसविक्रीसाठी कारमधून घेऊन जाणा-या दोघांवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली आहे. यात 130 किलो मांस आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) पहाटे सोमाटणे टोलनाक्यावर करण्यात आली आहे.

सनी मोहन वाल्मिकी (वय 29), संदीप जगदीश लोहट (वय 39, दोघे रा. एम बी कॅम्प, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई लक्ष्मण शामराव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास आरोपी एमएच 14 एचडब्ल्यू 8656 या कारमधून एका प्राण्याला जीवे मारून त्याचे मांस विक्रीसाठी घेऊन जात होते.

सोमाटणे टोलनाक्यावर हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी कारमधून 13 हजार रुपये किमतीचे 130 किलो मांस आणि एक लाख 50 हजार रुपये किमतीची कार जप्त करत दोघांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.