Talegaon : शिवरत्न सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रताप शेलार

As the President of Shivaratna Sahakari Patsanstha, Adv. Pratap Shelar

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील माळवाडी येथील शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नोटरी ॲड. प्रताप तुकाराम शेलार यांची एकमताने निवड झाली.

मावळते अध्यक्ष भालचंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व पतसंस्थेचे संस्थापक विकास शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. या सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

विकास शेलार यांनी संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश दाभाडे, संभाजी शेलार, विक्रम जाधव, अंबर दाभाडे यांनीही अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.

शेलार यांनी याआधी वडगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच ते शिवरत्न फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेवर कार्यरत आहेत.

संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सदस्यांसाठी विविध योजना राबविणार असल्याचे नूतन अध्यक्ष ॲड. प्रताप शेलार यांनी निवडीनंतर सांगितले. व्यवस्थापिका नर्गीस तांबोळी यांनी आभार मानले.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष-ॲड. प्रताप शेलार, उपाध्यक्ष- सूर्यकांत ओसवाल, खजिनदार – विठ्ठल घारे, सचिव-सुमीत दाभाडे, संचालक- भालचंद्र राऊत,राजाराम गाडे, दीपाली मराठे, अरुण कराळे,रमण पवार, तानाजी शेलार, संतोष मराठे व सुलभा शेलार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like