Talegaon : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज – चौघांनी एका अल्पवयीन मुलाला मारहाण (Talegaon) करत त्याची सोन्याची चैन गहाळ केली. ही घटना सोमवारी (दि.27) सोमाटणे फाटा येथे घडली आहे.

यावरून अल्पवयीन मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी प्रज्वल दाभाडे उर्फ वेदांत भेगडे, तेजस पवार, संतोष दिले (सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी जवळ जाऊन जुने भांडण उकरून काढले व फिर्यादीला दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले.

Maharashtra : राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तसेच, आयफोन 13 प्रो, सोन्याची चैन गहाळ केली. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप (Talegaon) आरोपींना अटक केलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.