Talegaon : रॉकेल ओतून पेटवून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरातील किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत पतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नवलाख उंब्रे येथे 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. याबाबत ५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील शिवानंद कांबळे (वय 22, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा आरोपी पती यांच्यामध्ये किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी पतीने फिर्यादी यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.