Talegaon : बजरंग दलाच्या दुर्गवहिनीने पोलिसांना बांधली राखी

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळेगाव दाभाडे उपखंड व दुर्गा वाहिनी देहू प्रखंड विश्व हिंदू परिषद संचलित संजीवनी बालिका आश्रमच्या अधिक्षीका आसावरी भूटकर आणि वि.हि.प दुर्गा-वाहिनी देहू प्रखंड संयोजिका अर्पिता फाकटकर यांच्या समवेत मानसी घोडके, साक्षी पडेकर, प्रतीक्षा फाकटकर, आरती कांबळे, ऐश्वर्या कांबळे, श्रुष्ठी बलाल, निकिता कल्लूरु या सर्व भगिनींनी तळेगाव दाभाडे आणि देहूरोडमधील पोलीस बंधू-भगिनींना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

या रक्षाबंधन कार्यक्रमास तळेगाव शहर भा.ज.पा अध्यक्ष व निर्मलवारी प्रमुख संतोष दाभाडे पाटील उपस्थित होते. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीद वाक्याप्रमाने आपल्या तळेगाव नगरीच्या संरक्षणाचे काम चोखपणे पार पाडणारे व तळेगावमधील नागरिकांच्या सुरक्षेस नेहमीच प्रथम प्राधान्य देणारे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, ए.पी.आय गावडे, पी.एस.आय बाजगिरे, पी.एस.आय संदीप गाडलीकर, पोलीस नाईक युवराज वाघमारे व सर्व पोलीस कर्मचारी उपस्तिथ होते.

  • या रक्षाबंधनाच्या माध्यमातून आपले पोलीस बांधवांशी असलेले प्रेमाचे, सुरक्षेचे, आपुलकीचे, विश्वासाचे नाते अजूनच बळकट झाले आहे. या कार्यक्रमास पुणे व सोलापूर जिल्हा शासकीय अधिकारी संदेश भेगडे, विश्व हिंदू परिषद तळेगाव अध्यक्ष प्रसाद कुर्हे, बजरंग दल तळेगाव दाभाडेचे मंत्री लक्ष्मण भेगडे, बजरंग दल तळेगाव संयोजक ओंकार भेगडे, सह- संयोजक विशाल निघोजकार, गो-रक्षक प्रमुख प्रतीक भेगडे, धर्मप्रसारक कपिल देवाडीगा, प्रसारमाध्यम प्रमुख हेमंत कडवे उपस्तिथ होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.