Talegaon : मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांकडून मजुराला मारहाण

Beating a laborer by four for demanding wage money : मारहाण करणाऱ्या चार जणांविरोधावत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मजुरीचे पैसे मगितल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका मजुराला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजता शंकरवाडी ( ता. मावळ) येथे घडली.

जितेश मलकेश भोईर (वय 23, रा. शंकरवाडी, सोमटणे) असे जखमी मजुराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी शुभम हणमंता कोळी, अरविंद अमर कोळी, अविनाश अमर कोळी, हणमंता कोळी (सर्व रा. शंकरवाडी, सोमटणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितेश आरोपींकडे काम करत होते. मजुरीचे पैसे जितेश यांनी आरोपींकडे मागितले.

त्यावरून आरोपी अरविंद कोळी याने बॅटने, आरोपी अविनाश कोळी याने दगडाने आणि आरोपी शुभम व हणमंता यांनी लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.