Talegaon : भांडणे सोडविण्यास गेलेल्या वकिलाला मारहाण

एमपीसी न्यूज – बिअर बारमध्ये भांडण सुरु असल्याने ती भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या वकिलाला चौघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री साडेदहा वाजता तळेगाव-चाकण रोडवर अलंकार बिअरबार येथे घडली.

विनायक प्रतापराव डुबळ (वय 40, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे जखमी वकिलाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश अरुण घबाडे (रा. तळेगाव दाभाडे), भूषण आसावले (रा. टाकवे, ता. मावळ) आणि अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण रोडवर असलेल्या अलंकार बिअरबारमध्ये आरोपी हे फिर्यादी यांचा मित्र सचिन सावळे यांना मारहाण करीत होते. ती भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. फिर्यादी हे बिअरबारच्या बाहेर आले असता दोन अनोळखी इसमांपैकी एकाने डोक्यात विट फेकून मारली. तर दुस-या अनोळखी इसमाने सळई तोंडावर मारून फिर्यादी यांना जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.