Talegaon : घरासमोर गर्दी करू नका म्हटल्यावरून दोघांना मारहाण, दोन महिलांचा विनयभंग

एमपीसी न्यूज – घरासमोर गर्दी करू नका म्हटल्यावरून तिघांनी मिळून दोन भावांना बेदम मारहाण केली. तर दोन महिलांशी गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली.

आयुब उस्मान मुलाणी (वय 43), झाकीर उस्मान मुलाणी (वय 40), तन्वीर खान (वय 20, सर्व रा. इंदोरी, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकारणी 21 वर्षीय महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरासमोर गर्दी केल्याने फिर्यादी महिलेच्या दिराने आरोपींना घरासमोर गर्दी करू नका, कोरोनाची साथ चालू आहे, असे सांगितले. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेचा दिर आणि पती या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी आणि त्यांची जाऊ यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

भांडण झाल्यानंतर सर्वजण घरात गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घरावर दगड मारले. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.