Talegaon : ‘भाग्ये देखीले तुका’ने सृजन नृत्य महोत्सवाचा कळस रचला

एमपीसी न्यूज : गेल्या पाच दिवसांपासून (Talegaon) सुरु असलेल्या सृजन नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षनिमित्त आयोजित सृजन नृत्य महोत्सवाची सांगता कलापिनीच्या कै. डॉ.शं.वा. परांजपे नाट्यसंकुलात संपन्न झाली. तळेगाव नगरीत इतका नेत्रदीपक भव्य दिव्य नृत्यमहोत्सव पहिल्यादाच संपन्न झाला आणि तोही रसिकांच्या प्रंचड प्रतिसादात…

भरतनाट्यम् या प्राचीन नृत्यशैलीचा प्रचार व प्रसार आपल्या मावळातील अगदी छोट्यातल्या छोट्या गावांपर्यंत व्हावा ह्या उद्दात हेतूने सृजन नृत्यालय गेली 27 वर्षे कार्यरत आहे. तळेगावचा सांस्कृतिक वारसा जपण्यात व सातत्याने सुरु ठेवण्यात कलापिनी, श्रीरंग कलानिकेतन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद प्रमाणेच सृजन नृत्यालय सुद्धा अग्रणी आहे.

ह्या सांगता समारंभास प्रमुख अतिथी म्हणून श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार शिवराम भसे आणि तळेगावातील विठ्ठल मंदिराचे संचालक ह.भ.प.माऊली दाभाडे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन (Talegaon) झाले. त्याचवेळी प्राची गुप्तेने आपल्या सुश्राव्य गायनातून माऊलींच्या पसायदानाप्रमाणेच नामदेवांनी भगवंताजवळ मागितलेले अलौकिक दान “अहंकाराचा वारा न लागो राजसा | माझ्या विष्णुदासा भाविकांसी ||” ह्या अभंगाचे श्लोकस्वरूप गायन केले.

एखाद्या नृत्यनाट्यातून इतक्या प्रभावीपणे तुकाराममहाराज सामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकतात याचेच ह.भ.प. बाळासाहेब काशीद ह्यांनी कौतुक केले. ह्या नृत्यनाट्याचे महाराष्ट्र नव्हे तर भारतभरात प्रयोग व्हावेत आणि शक्य तेवढी मदत भंडारा डोंगर समितीकडून केली जाईल ह्याचेही आश्वासन दिले. ह. भ. प. नंदकुमार भसे महाराज व ह. भ. प. माऊली दाभाडे ह्यांनी पण नृत्यनाट्याचे कौतुक केले. ज्ञानप्रबोधिनी निगडीचे केंद्र संचालक शिवराज दादा यांनी या नृत्यनाट्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. मीनल यांच्या आई सुनंदा जोशी यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अनेक महिन्यांपासून झटणाऱ्या सृजन परिवाराला व रसिकांना धन्यवाद दिले. डाॅ. परांजपे यांनी सर्वंकष आढावा घेत महोत्सवाची सांगता केली.

भागवत धर्माचा मेरुमणी असणारे निर्भीड संतकवी म्हणजे तुकाराम (Talegaon) महाराज. तुकोबांचा आणि तळेगावचा ऋणानुबंध सर्वाना ज्ञात आहेच. शाळा चौकातील विठ्ठल मंदिरात तुकोबा कायम कीर्तनासाठी यायचे. शिवाय ज्यांनी तुकाराम गाथा जपली असे गंगाधरपंत मवाळ तळेगांवचे तर संताजी जगनाडे शेजारील सुदुंबऱ्याचे. थोडक्यात काय तर जगद्गुरू तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी.

Pune News : अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई; 2000 बॉक्स जप्त

अशा तुकोबांचे कार्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आजच्या ‘भाग्ये देखिला तुका’ ह्या तुकोबांच्या जीवनावर आधारित नृत्यनाट्यातून केला गेला. जवळजवळ 50 कलाकारांना घेऊन (Pune) आजचा हा शुभारंभाचा देखणा प्रयोग अतिशय दिमाखात पार पडला. हे नृत्यनाट्य, सृजनाच्या संचालिका डॉ. मीनल कुलकर्णी ह्यांच्या लेखणीतून साकार झाले असून गीत रचना कवि दिनेश कुलकर्णी तर संगीत दिग्दर्शन सुप्रसिद्ध गायिका संपदा थिटे हिचे आहे. गायक संजीव मेहेंदळे, शुभदा आठवले (संवादिनी), प्रणव कुलकर्णी (सिंथेसायझर), मंगेश राजहंस (तबला), सचिन इंगळे (पखवाज), प्रवीण ढवळे, योगीराज राजहंस, गंधार ढवळे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली.

संपदा थिटे, लीना परगी, निधी पारेख, डॉ. प्राची पांडे, ऋतुजा उगीले, धनश्री शिंदे, चांदणी पांडे, प्राची गुप्ते, डॉ. सावनी परगी, अंकुर शुक्ल, प्रणव केसकर यांनी गायन केले.

प्रा. श्रीपाद भिडे यांनी अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले. रवी मेघावत आणि केदार अभ्यंकर ( ध्वनी संयोजन), गजानन वाटाणे, विनायक काळे, स्वच्छंद गंदगे (प्रकाश योजना), विराज सवाई, मनोरंजन पुणे, (नेपथ्य), प्रतिक मेहता, अनिरुद्ध जोशी (पार्श्वसंगीत), अरविंद सूर्य (रंगभुषा), दिपाली जोशी, प्रिती शिंदे, ॠचा वळवडे, वंदना गांधी, मॅकड्रप पुणे (वेषभुषा), विजय कुलकर्णी, ह्रतिक पाटील, चेतन पंडीत (रंगमंच व्यवस्था) या सर्वांच्या आणि कलापिनी व सृजन परिवारातील कलाकार, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे आणि उत्स्फुर्त प्रतिसाद देणारे मावळातले रसिक यांच्यामुळेच हा मावळातील सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारा भव्य नृत्य नाट्यमहोत्सव यशस्वी (Talegaon) झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.