Talegaon Crime News : तळेगाव, भोसरी एमआयडीसीमध्ये दोन घरफोड्या; सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 13) दोन घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन लाख 90 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

शैलेंद्र सुरेश भागवत (वय 47, रा. न्यू आनंदनगर, तळेगाव दाभाडे. मूळ रा. घोरपडी पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर मंगळवारी (दि. 12) रात्री नऊ ते बुधवारी (दि. 13) सकाळी सात वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 64 हजारांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

भारती जितेंद्र चौधरी (वय 37, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 10) सायंकाळी सहा ते सोमवारी (दि. 11) सकाळी सव्वानऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे इनोव्हेटिव्ह सोल्युशन इंडिया प्रा. ली. या कंपनीच्या पाठीमागून बाजूने पत्रा उचकटून आत प्रवेश केला. स्टोअर रूम मधून तीन लाख 26 हजार 843 रुपये किमतीच्या 52 प्रकारच्या केबल वायर चोरून नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.