Talegaon : ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने सभासदांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने मावळच्या मावळातील ज्येष्ठ नागरिकांचा संस्थेच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू देऊन घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

यासाठी संस्थेजवळ 700 स्वयंसेवक व पदाधिकारी सकाळी आठ पासून कार्यरत होते. तळेगावमध्ये माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या 80 सभासदांच्या कार्यकारिणीतीली 18 सभासदांचा सपत्नीक सन्मान प्रसिध्द उद्योजक शंकरराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.

  • शंकर शेळके व त्यांच्या पत्नी सुमन शेळके यांचाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख आणि संस्थेचे सभासद गणपत काळोखे, दशरथ ढोरे, लहुजी ढेरंगे, विठ्ठल कांबळे, अंबादास संदानशिव, उमाकांत कुलकर्णी, प्रदीप साठे आदींचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त सत्कारार्थी उत्सव मूर्तींना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक आणि उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.