Talegaon Dabhade: तळेगाव भाजपच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन

Talegaon BJP agitates against MSEDCL and mahavikas aghadhi 100 युनिट माफी तर नाहीच, पण लॉकडाउनच्या काळात वीज दरवाढ व सरासरीच्या नावाखाली जनतेची लूट करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे भाजपच्या वतीने महाविकासआघाडी सरकारच्या व महावितरण मंडळाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर येथील महावितरणाच्या उपकेंद्रातील उपकार्यकारी अभियंता गोरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीकडून निवडणुकीपूर्वी 100 वीज युनिट मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर मात्र हे सरकार सरड्यासारखे रंग बदलताना दिसत आहे.

100 युनिट माफी तर नाहीच, पण लॉकडाउनच्या काळात वीज दरवाढ व सरासरीच्या नावाखाली जनतेची लूट करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

यावेळी शहराध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे, गटनेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, संतोष शिंदे, नगरसेविका शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, काजल गटे, महाराष्ट्र प्रदेश सचिव ज्योती जाधव, संघटन मंत्री सचिन टकले, रजनी ठाकूर, प्रमोद देशक, प्रदीप गटे, विनायक भेगडे, महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी भेगडे, कार्याध्यक्षा अश्विनी काकडे, स्टेशन महिला मोर्चा अध्यक्षा अंजली जोगळेकर, कार्याध्यक्षा तनुजा दाभाडे, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय भेगडे, कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.