Talegaon : पोलीस आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या संयुक्त परेडवर भाजपच्या वतीने पुष्प वर्षाव

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरात अत्यावश्यक सेवेत काम करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव दाभाडे नगरीपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. कानडे यांच्या वतीने आयोजित संयुक्त परेडवर भारतीय जनता पक्ष तळेगाव शहर यांच्या वतीने पुष्पवर्षाव करण्यात आला.

यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’, च्या घोषणांनी व देशभक्तीपूर्ण वातावरणात संपूर्ण जिजामाता चौक परिसर रंगून गेला होता. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, शहराध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे यांच्या हस्ते मास्क आणि ओआरएस एनर्जी ड्रींकचे वाटप करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस कर्मचारी, सर्व आरोग्य कर्मचारी, सेविका यांच्यासह तळेगाव दाभाडे नगरपालिका प्रशासकीय कर्मचारी, सफाई कामगार आदी या परेडमध्ये सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.