Talegaon Dabhade : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे तळेगाव, वडगावात ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

Talegaon Dabhade: BJP's 'Save Maharashtra' agitation in Talegaon, Wadgaon against Maha Vikas Aghadi government

एमपीसीन्यूज – कोरोना संकटापासून महाराष्ट्राला वाचविण्यात, विविध समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टी-तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने आज (शुक्रवारी) तळेगाव दाभाडे शहर भाजपा कार्यालय येथे महाविकास आघाडी विरोधात ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात घणाघाती हल्ला चढविला. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सरकारच्या अपयशांचा पाढा वाचला. शहराध्यक्ष रवींद्र बाळासाहेब माने यांनी सरकारवर नाकर्तेपणाची टीका केली.

या वेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात सोशल डिस्टसिंग पाळून काळे मास्क-काळी फित-काळे झेंडे व फलक दाखवून आपले ‘आंगण हेच रणांगण ‘ हे अभियान आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष संदीप काकडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, प्रदेश चिटणीस ज्योती जाधव, माजी शहराध्यक्ष संतोष ह.दाभाडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, नगरसेविका शोभा भेगडे, नगरसेवक अरुण भेगडे, महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी भेगडे, कार्याध्यक्षा अश्विनी काकडे,ॲड. तनुजा दाभाडे, संघटनमंत्री सचिन टकले, खजिनदार सतीश राऊत, सरचिटणीस रजनी ठाकूर, शोभा परदेशी, विनायक भेगडे, प्रदीप गटे, रवींद्र साबळे, रवींद्र भोसले,भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे, विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष मयुर भोकरे, सहकार आघाडी अध्यक्ष संतोष परदेशी, उपाध्यक्ष संजय जाधव, आशुतोष हेंद्रे, नीलेश येवले, ओबीसी आघाडी कार्याध्यक्ष सचिन जाधव, पदवीधर आघाडी अध्यक्ष अलंकार भोसले, अरुण भेगडे, गणेश क्षीरसागर, केदार भेगडे, तुषार दळवी, वैभव कोतुळकर, ललीत गोरे, रणजीत पिंगळे, साजिद शेख आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगाव शहर भाजपचे कार्याध्यक्ष महेंद्र पळसे यांनी आभार मानले.

_MPC_DIR_MPU_II

वडगाव मावळ येथे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने तोंडाला काळे मास्क लावून आणि हातात निषेध फलक घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

मावळ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मावळ तालुका कार्यालय येथे जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, संघटन मंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनिल चव्हाण वडगाव शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी वडगांव, मावळ तालुक्यातील,प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.