Talegaon : नगरसेवक अरुण माने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आणि 500 सॅनिटायजर बॉटलचे वाटप

Blood donation camp and distribution of 500 sanitizer bottles on the occasion of corporator Arun Mane's birthday

एमपीसीन्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षम नगरसेवक अरुण माने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात 45 दात्यांनी रक्तदान केले. तसेच 500 सॅनिटायजर बॉटलचे वाटप करण्यात आले.

नगरसेवक अरूण माने यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक संतोष भेगडे यांच्यावतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 500 सॅनिटायजर बॉटलचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, नाना कारके, सुरेश धोत्रे, उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेवक अरूण भेगडे, पक्षप्रतोद अमोल शेटे, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, आयुब सिकिलकर, प्रेमनाथ परदेशी, गोपाळ परदेशी, संतोष परदेशी, किशोर कवडे, किरण साळवे, जमीर नालबंद, विशाल पवार, बाप्पू कदम, चेतन कवडे संकेत माने,आशिष हिरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित शिबिरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना रक्तदान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.