Talegaon : बीएमके उद्योग समूह व लाईफलाइन हाॅस्पिटलतर्फे कोविड सेंटरला हिटर आणि पल्स ऑक्सिजन मशीन भेट

BMK Industries Group and Lifeline Hospital donate heater and pulse oxygen machine to Kovid Center

एमपीसीन्यूज : बी. एम. के.उद्योग समूहाचे डायरेक्टर व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे आणि काँग्रेस कमिटी डाॅक्टर सेलचे महाराष्ट्र राज्य सचिव, लाईफलाइन हाॅस्पिटलचे डाॅ. सुनील कुंभार यांनी तळेगाव दाभाडे येथील कोविड केअर सेंटरला आज, मंगळवारी भेट दिली. यावेळी या सेंटरला गरम पाण्याचा हिटर आणि पल्स ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिले.

मावळचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे, डाॅ. पदमवीर थोरात, तालुका समन्वयक डाॅ. गणेश बागडे, डाॅ. मीनाक्षी बलगे, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे, बीएमके बिल्डकाॅन प्रा. लिमिटेडचे डायरेक्टर विक्रम काकडे, एल अँड टी कंपनीचे मॅनेजर गोरखनाथ आवटी, बीएमके ग्रुपचे मयुरेश भेगडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे या कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानत अजून काही आवश्यकता भासल्यास आमच्या कंपनीतर्फे आवश्यक ती मदत करत राहू, असे संग्राम काकडे यांनी सांगितले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी सुधीर भागवत आणि डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी बीएमके उद्योग समूह व लाईफलाइन हाॅस्पिटलचे आभार मानून कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.