Talegaon : बंद फ्लॅटमधून घरात घुसून 42 हजारांचा ऐवज लंपास

0

एमपीसी न्यूज – बंद फ्लॅटच्या गॅलरीतून शेजारच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून 41 हजार 900 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री मावळ तालुक्यातील शिरगाव येथे उघडकीस आली.

अनिल बजरंग सावंत (वय 28, रा. अभिमान हाउसिंग सोसायटी, शिरगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल यांचा फ्लॅट मागील काही दिवसांपासून बंद आहे. 15 मार्च ते 19 मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी अनिल यांच्या फ्लॅटच्या गॅलरीमधून त्यांच्या शेजारी राहणा-या स्नेहा रवी कोळी यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला.

स्नेहा कोळी यांच्या फ्लॅटमधून 37 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 1 हजार 900 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, दोन हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक हजार रुपये किमतीचे आयबॉल कंपनीचे होम थिएटर असा एकूण 41 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like