Talegaon : आलिशान कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – शिरगाव ते सोमाटणे फाटा (Talegaon) या मार्गावर एका आलिशान कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. तर एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली.

एमएच 14/एचक्यू 0008 क्रमांकाच्या कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्यासोबत दुचाकीवरून शिरगाव येथून सोमाटणे फाटा या मार्गावरून जात होते. त्यावेळी त्याच रस्त्यावरून भरधाव वेगात आलेल्या कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली.

Pune : ब्रह्मनाद कला मंडळ आयोजित 22व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा समारोप

यामध्ये फिर्यादी यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली. तर फिर्यादी (Talegaon) यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता कारचालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.