Talegaon: पत्नीला घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या व्यक्तीला कारची धडक; गंभीर जखमी

Talegaon: Car hit a man who came to the hospital to pick up his wife एका अनोळखी स्विफ्ट कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. वाल्मिकी रस्त्यावर पडले. त्यांच्या मानेवर, डोक्यात आणि बरगडीवर गंभीर दुखापत झाली.

एमपीसी न्यूज – रुग्णालयात काम करणा-या पत्नीला घरी नेण्यासाठी आलेल्या पतीला एका कारने जोरात धडक दिली. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला. अपघातात जखमी व्यक्तीच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 25) रात्री सात वाजता जनरल हॉस्पिटलसमोर तळेगाव स्टेशन येथे झाला.

ओमप्रकाश कालीचरण वाल्मिकी (वय 58, रा. वराळे, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाल्मिकी यांच्या पत्नी तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटलमध्ये काम करतात. शनिवारी रात्री सात वाजणाच्या सुमारास वाल्मिकी त्यांच्या पत्नीला रुग्णालयातून घरी नेण्यासाठी आले होते. मात्र, वाल्मिकी आले त्यावेळी पत्नीची सुट्टी झाली नव्हती. त्यामुळे वाल्मिकी शिवाजी चौकाकडे पायी चालत जात होते.

त्यावेळी एका अनोळखी स्विफ्ट कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. वाल्मिकी रस्त्यावर पडले. त्यांच्या मानेवर, डोक्यात आणि बरगडीवर गंभीर दुखापत झाली.

या अपघातात वाल्मिकी यांच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. अपघात घडल्यानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.