Talegaon : शाळांना सॅनिटायझर व सॅनिटायझर स्टँड वाटप करून अजितदादांचा वाढदिवस साजरा

Celebrate Ajit Dada's birthday distributing sanitizer stands to schools

एमपीसीन्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुनिता काळोखे यांच्यावतीने नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळांना सॅनिटायझर व सॅनिटायझर स्टँड वाटप करण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे, युवक शहराध्यक्ष आशिष खांडगे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, ज्येष्ठ नेत्या रुपाली दाभाडे, इनरव्हील क्लब अध्यक्ष प्रवीण साठे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा शैलेजा काळोखे, शहर उपाध्यक्षा ज्योती शिंदे, युवती अध्यक्षा निशा पवार, सरचिटणीस अदिती सोरटे, चिटणीस रेखा दरेकर, ओबीसी सेल महिला शहराध्यक्षा विद्या भोसले, सविता मंचरे यांच्यासह सर्व शाळांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्याकडून नवीन समर्थ विद्यालय येथे 61 फळझाडे देऊन वृक्षारोपण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.