Talegaon : लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे माजी अध्यक्ष ॲड.चंद्रकांत संघवी यांचे निधन

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड.चंद्रकांत शामचंद संघवी (शहा वकील) यांचे मंगळवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

चंद्रकांत संघवी लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे संस्थापक सचिव होते. वडगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. तळेगाव रोट्रॅक्ट क्लबचे माजी अध्यक्ष व माजी प्रांतपाल रुपल संघवी यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र संघवी आणि तेजपाल संघवी यांचे ते बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.