Talegaon : तळेगाव स्टेशन चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन परिसरातील वाहतुक सुरळीत आणि विना अडथळा सुरु ठेवण्यासाठी काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी नुकतेच काढले. हे बदल पुढील काही दिवस प्रायोगिक तत्वावर करण्यात आले आहेत. याबाबत काही हरकती आणि सूचना असतील तर त्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

तळेगाव स्टेशन परिसरातील वाहतुकीत झालेले बदल –
# चाकण तळेगाव मार्गावर दोन्ही बाजूंना सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
# वरील मार्गावरील सर्व अवजड वाहने इंदुरी येथील टोल नाक्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पार्क करता येतील.
# पोस्ट ऑफिसकडून तळेगाव स्टेशनकडे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.
# सर्व वाहनांना पर्यायी मार्ग तळेगाव स्टेशन ते शिवाजी चौक सिंडिकेट चौकातून परत तळेगाव चाकण रोडला जाता येईल.
# तळेगाव चाकण रोडवर एसटी स्टँड येथून तळेगाव स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी ईगल         कंपनीकडून तळेगाव चाकण रोडवरून इच्छित स्थळी जावे.
# जयशंकर चौक ते मारुती चौक दरम्यान सम विषम पार्किंग करण्यात आले आहे.
# स्टेशन चौक ते सिंडिकेट बँक चौकाकडे जाणारा रस्ता नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
# स्टेशन चौक ते सेवाधाम हॉस्पिटल रस्ता नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
# तळेगाव मारुती चौकात नो पार्किंग.
# तळेगाव स्टेशन येथील यशवंत चौकात स्टेशन जवळ 100 मीटर परिसरात, तळेगाव पोस्ट ऑफिस ते रेल्वे स्टेशन, जिजामाता चौक ते जयशंकर      चौक तसेच
# या मार्गावरील सर्व वाहन चालकांना तळेगाव स्टेशन बाजूच्या मोकळ्या जागेत , भाजी मार्केट जवळील जागेत वाहने पार्क करता येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.