Talegaon : शिवजयंतीनिमित्त तळेगाव दाभाडेमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – शिवजयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल बुधवारी (दि. 19) सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत असणार आहेत.

शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती गणेश वसंत खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 19) जिवंत देखाव्याच्या चित्ररथासह शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे शहर व परिसरातील 27 शाळा सहभाग घेणार आहेत. ही शोभायात्रा सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

शोभा यात्रेच्या दरम्यान सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत लिंब फाट्याकडून मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी अन्नपूर्णा हॉटेल समोरून कडोलकर कॉलनी, डंबे मंडप कॉर्नर, खांडगे पेट्रोल पंप हा पर्यायी मार्ग वापरता येणार आहे. पोलीस, अग्निशमन व रुग्णवाहिका या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. दुपारी दोन नंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like