Talegaon : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तळेगावमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे मधील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल गुरुवारी (दि. 24) पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळपर्यंत राहणार आहेत.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग –
# वडगाव – इंदोरी या दोन्ही मार्गावरील वाहतूक पहाटे चार ते सायंकाळी सातपर्यंत बंद राहणार आहे.
या मार्गावरील वाहनांना वडगाव लिंब फाटा, मारुती चौक, जयशंकर चौक एक, जिजामाता चौक, खांडगे पेट्रोल पंप, स्टेशन चौक मार्गे चाकणच्या दिशेने जाता येईल.
# वडगाव फाटा ते स्टेशन चौक या दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहील.
या मार्गावरील वाहनांना तळेगाव स्टेशन चौक, खांडगे पेट्रोल पंप, जिजामाता चौक, जयशंकर चौक दोन, मारुती मंदिर चौक, लिंब फाटा, वडगावकडे जाता येईल.
# उर्से टोल नाक्याकडून वडगाव फाट्याकडे येणा-या वाहनांना सकाळी सहा ते दुपारी तीन या कालावधीत बंदी आहे. या मार्गावरील वाहनांनी उर्से टोलनाका, सोमटने फाटा येथून इच्छित स्थळी जावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like