Talegaon : विहिरीत पोहताना पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

एमपीसीन्यूज : विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२२)रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव स्टेशन परिसरात नवीन समर्थ विद्यालयाजवळील विहिरीत ही दुर्घटना घडली.

प्रज्वल प्रशांत भालेराव (वय १६,रा. गवत बाजार, हरणेश्वरवाडी, तळेगाव स्टेशन) असे विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

या संदर्भात प्रदोष नंदकुमार मोरे(वय ४२, रा, खांडगे कॉलनी, तळेगाव स्टेशन) यांनी येथील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खबर दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रज्वल भालेराव आणि त्याचे तीन-चार मित्र शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी विहिरीतील पाण्यात उतरले. मात्र, यामध्ये दुर्देवाने प्रज्वल पाण्यात बुडाला. आरडा ओरडा ऐकूण प्रदोष मोरे यांनी विहिरीत उडी मारली. मात्र, ते त्यास वाचवू शकले नाहीत.

त्याचवेळी शिवदुर्ग रेस्क्यू टीम व वन्यजीव रक्षक टीमने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. अनिल आंद्रे, महेश मसने, प्रविण देशमुख, साईराज हुळावळे, निकेत म्हाळसकर, सुनिल गायकवाड, निलेश गराडे, भास्कर माळी, गणेश निसाळ, व इतर वन्यजीव रक्षक टीमचे सदस्य उपस्थित होते.

प्रज्वल भालेराव याने दहावीची परीक्षा दिलेली होती. तो सरस्वती विद्यालयात शिकत होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.