Talegaon Dabhade : नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : अनिल भांगरे

Complete nalah-cleaning work before monsoon: Anil Bhangre

एमपीसीन्यूज : पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील नालेसफाईची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार अनिल भांगरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात भांगरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव परिसरातील डांबरी रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत.

त्यामुळे त्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होऊन तिथे चिखल होऊन अपघात व दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होते. परिसरातील ओढे, नाले, गटारी बुजलेल्या अवस्थेत आहेत.

पावसाच्या पाण्यामुळे त्या आणखी बुजणार व त्याचे पाणी सार्वजनिक रस्त्यावर, नागरीवस्तीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. विशेषतः हिंदमाता भुयारी मार्गावर मोठया प्रमाणात पाणी व गाळ येऊन मागील वर्षीप्रमाणे साचून तुबंण्याची दाट शक्यता आहे.

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये, तसेच प्रदुषित पाण्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागू नये म्हणून पावसाच्या पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या समस्यांचा निपटारा करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, पाण्याच्या टाक्या साफ करून त्या निर्जंतुकिकरण करण्यात याव्यात, असे ही भांगरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.